Himachal Rain
Himachal Rain

Himachal Rain : हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 4 हजार कोटींचं नुकसान

नद्यांना पूर आल्याने गावचा संपर्क तुटला
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

हिमाचलमध्ये पावसाचा कहर

4 हजार कोटींचं नुकसान

नद्यांना पूर आल्याने गावचा संपर्क तुटला

(Himachal Rain) हिमाचलमध्ये पावसाने खूप हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे ढगफुटी, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या तीन महिन्यांत झालेल्या आपत्तीमुळे राज्याला तब्बल ४,०७९ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे झालेल्या दुर्घटना आणि अपघातांमध्ये 366 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. डोंगर कोसळून रस्ते बंद झाले, पूल वाहून गेले, तर नद्यांना पूर आल्याने गावचा संपर्क तुटला. अनेक घरं जमीनदोस्त झाली, तर शेतकऱ्यांची पिके वाहून गेली. मुसळधार झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

यासोबतच वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला. राष्ट्रीय महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या, काही ठिकाणी मार्ग पूर्णपणे बंद पडले. ढगफुटीच्या घटनांमुळे काही गावे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचली आहेत. हिमाचलसोबतच शेजारच्या पंजाब राज्यातही पावसाने कहर केला. तेथील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पूरामुळे बंद असलेली शाळा आणि महाविद्यालये ८ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com