Maharashtra Rain: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Rain: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

मुंबईच्या नरिमन पॉईंट आणि मंत्रालय परिसरात पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. मागच्या अनेक दिवसापासून पाऊस गायब झाला होता.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबईच्या नरिमन पॉईंट आणि मंत्रालय परिसरात पावसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. मागच्या अनेक दिवसापासून पाऊस गायब झाला होता. मुंबईकरांची उन्हामुळे काहीली झाली होती. उत्तर प्रदेशातील मथुरा शहरात जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणीच पाणी साचले आहेत. पाणी तुंबल्याचा घटनांमुळे मथुरावासीय हैराण झाले आहेत. तसेच अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये 24 तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि व्यापारांच्या दुकांनमध्ये पाणी शिरले आहे. दोन महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कपाशी, सोयाबीन व तूर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत.

आज विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूर, वर्धा आणि भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अकोला वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हयात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जंगलव्याप्त पाथरी गावात विजेच्या कडकडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला. सुमारे 2 तास मुसळधार पावसामुळे दहा ते बारा घरात दीड ते दोन फूट पाणी साचले. मेघ गर्जनेसह आलेल्या पावसाने सुमारे दोन तास झोडपले. मुसळधार पावसामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com