Raj Thackeray On Hindi Compulsion : "सरकारचा कट उद्ध्वस्त करण्यासाठी हा मोर्चा"; राज ठाकरेंची भव्य मोर्चाची घोषणा
महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषा सक्ती हा मुद्दा मनसेने चांगलाच उचलून घेतला. यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी पुस्तक विकणाऱ्या दुकानदारांना हिंदी पुस्तक विकण्यास मनाई केली होती. अनेकठिकाणी मोर्चा केले होते. नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये राज ठाकरेंनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. रविवार 6 जुलै सकाळी 10 वाजता गिरगाव चौपटीवर हिंदीसक्ती विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहेत. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, संपुर्ण मोर्चा हा मराठी माणसांचा असे. मोर्चाचे नेतृत्व मराठी माणूस करणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. या मोर्चामध्ये साहित्यिक, पालक, विद्यार्थी यांची उपस्थितीत असेल, सरकारला एखादा समजलं पाहिजे की, सरकारच्या मनात नेमकं काय आहे? ते, सर्व राजकीय नेत्यांसोबत बोलणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सरकारने शिजवलेला हा कट उद्ध्वस्त करण्यासाठी हा मोर्चा आहे.