Raj Thackeray On MNS Morcha : मोर्चानंतर अखेर राज ठाकरे झाले व्यक्त! माध्यमांशी बोलण्यावर बंदी ; कार्यकर्त्यांना आदेश, नेमकं काय लिहिलं ?
Raj Thackeray On MNS Morcha : भाषेवरून झालेला मराठी-गुजराती वादाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. मराठी न बोलल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोड परिसरातील एका मिठाई दुकानदाराला मारहाण केली होती. यानंतर 3 तारखेला परिसरातील व्यापाऱ्यांनी याच्या निषेधार्थ मोर्चा काढला. यात जय मारवाडी, जय गुजराती अशा घोषणा देखील देण्यात आल्या. आता याच्याविरोधात समाजात तेढ निर्माण केल्याने "मराठी एकजूट" हा "मराठी मोर्चा" काढण्यात आला आहे.
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात हा मोर्चा सकाळी 10 वाजता निघणार होता. परंतु त्याआधीच अविनाश जाधवांना ताब्यात घेतलं गेलं होतं. याचपार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक ट्विट पोस्ट केलली आहे. माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणताही व्यक्ती प्रसारमाध्यामांशी संवाद साधायचा नाही, असं राज ठाकरे यांनी खडसावून सांगितले आहे.
राज ठाकरे ट्विटमध्ये लिहितात की, "एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही."
पुढे राज ठाकरे लिहितात की, "आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही."