राज ठाकरेंची लता दीदींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भावूक पोस्ट

राज ठाकरेंची लता दीदींच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त भावूक पोस्ट

भारताची गानकोकिळा दिवंगत लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारताची गानकोकिळा दिवंगत लता मंगेशकर यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. यानिमित्त मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करुन लिहिले की, दीदींच्या निधनाला आज एक वर्ष झालं. मागच्या वर्षी नेमक्या ह्याच दिवशी, माझ्यासकट देशातील लाखो, करोडो लोकांना काहीतरी तुटल्याची भावना जाणवली. आणि ही भावना पुढे काही काळ मनात घर करून होती. पण काही काळाने दीदींच गाणं पुन्हा कानावर पडलं आणि एक जाणवलं की मूर्त स्वरूपातील दीदी गेल्या असल्या तरी अमूर्त स्वरूपातील दीदी कायम राहणार. माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल, पण ह्यापुढे कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तितकाच आत ओढत राहील, शांत करत राहील. असे त्यांनी लिहिले आहे.

यासोबतच त्यांनी लिहिले की, माझ्यासारख्या अनेकांना दीदींचा आवाज कधीही आणि कुठेही ऐकला तरी तो क्षणात ओळखता येईल. पण यापुढं कदाचित अनेक पिढ्या सुद्धा हा आवाज कोणाचा आहे हे चटकन जरी नाही ओळखता आलं तरी तो तिकाचं आत ओढत राहिलं, शांत करत राहिल. चिरंजीवी होणं काय असतं हे जर मला विचारलं तर मी यालाच चिरंजीवी म्हणेन. त्यांच्या स्मृतींना माझं विनम्र अभिवादन, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com