मनसे करणार मोठा धमाका! बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांच्या व पक्षबदलाबद्दल भाष्य केले. तसेच या बैठकीमध्ये मनसेच्या पुढील काळातील राजकीय रणनीतीबद्दलही पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिवस साजरा होणार आहे. मुंबईमधील शिवाजी पार्कमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा तसेच सगळेच सहकुटुंब उपस्थित राहावे याबद्दलही राज ठाकरे यांनी सांगितले.
या बैठकीनंतर या बैठकीत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील मार्गदर्शन केले. मध्यंतरी मेळावा झाला होता पक्ष संघटनेच्या माध्यमातून काय करणार याचा लवकरचं निर्णय होईल, काही महत्वाचे बदल होणार आहेत ते लवकर पुढे येतील असे नांदगावकर यांनी म्हटले.मनसे पक्षात आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांमध्ये बदल निश्चित होतील, तसे राजसाहेब बोलले होते त्यानुसार होईल असेही नांदगावकर यांनी म्हटलं