साताऱ्यातील इतिहास अभ्यासक आनंद जाधव यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट

साताऱ्यातील इतिहास अभ्यासक आनंद जाधव यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साताऱ्यातील अतित गावात इतिहास अभ्यासक आनंद जाधव यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साताऱ्यातील अतित गावात इतिहास अभ्यासक आनंद जाधव यांची भेट घेतली. यावेळी अतित गावातील नागरिकांनी स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. वर्षभरापासून अतीतचे इतिहास अभ्यासक आनंदराव जाधव यांच्यासोबत त्यांची मैत्री झाली असून आज ते पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना अतित गावात थांबण्याची जाधव यांनी विनंती केली होती.

या विनंतीला मान देऊन त्यांनी आनंद जाधव यांच्या घरी भेट दिली. यावेळी अतित गावातील हनुमान मंदिरात जाऊन राज ठाकरे यांनी दर्शन घेतले. सध्या चित्रपटांमध्ये दाखवत असलेल्या चुकीच्या इतिहासाबाबत अनेक अभ्यासकांची राज ठाकरे भेट घेत आहेत. त्यातीलच ही एक भेट आहे.

सर्वसामान्य कुटूंबात राहणारे शिवचरित्र अभ्यासक आनंद जाधव यांचं घर साध्या पद्धतीचे आहे. तरीही सामान्य कुटुंबात राज ठाकरे यांनी भेट दिल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com