Raj Thackeray
Raj ThackerayRaj Thackeray

Raj Thackeray : राज्यात निकालांचा गदारोळ, मात्र मुंबईत राज ठाकरेंच्या हालचालीत वेगात

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

(Raj Thackeray) राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरवात झाली आहे. या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. याच दरम्यान, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. राज ठाकरे सध्या मुंबईत आहेत आणि ते पश्चिम उपनगरांत काही नवीन कार्यालयांचे उद्घाटन करत आहेत.

राज ठाकरे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी दक्षिण आणि पूर्व उपनगरांमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन केलं, आणि आज ते पश्चिम उपनगरांतील आठ प्रमुख शाखांचे उद्घाटन करणार आहेत. त्यासाठी ते सकाळीच शिवतीर्थ निवासस्थानाहून मार्गस्थ झाले.

आजचा दौरा कसा आहे?

राज ठाकरे आज गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर (शाखा ५६), मालाडमधील एच पी शॉपिंग सेंटर (शाखा ४६), दत्ता मंदिर रोड (शाखा ३६) आणि कुरार व्हिलेज (शाखा ३७) येथे मनसेच्या नवीन कार्यालयांचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर बोरीवली पश्चिमेकडील सत्यविजय सोसायटी (शाखा १८) आणि एक्सर मच्छी मार्केट (शाखा १०) येथे भेट देतील. दहिसर पश्चिमेकडील रामचंद्र पावसकर मार्गावरील शाखेचं (शाखा ७) उद्घाटन देखील ते करतील. त्यांचा आजचा दौरा जोगेश्वरी पूर्व येथील JVLR जवळच्या शाखा ७४ च्या उद्घाटनाने संपणार आहे. या दौऱ्यामुळे राज ठाकरे थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची संघटना मजबूत करत आहेत, ज्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल

राज ठाकरे मुंबईत पक्षाच्या संघटनाबद्दल लक्ष देत असताना, राज्यातील ग्रामीण भागातून नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. राज्यातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. प्राथमिक कलांनुसार महायुतीतून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनी अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. भाजपने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे, काही ठिकाणी त्यांना बिनविरोध विजय मिळाला आहे. मतमोजणीपूर्वीच धुळ्यातील दोंडाईचा-वरवाडे आणि जामनेरमध्ये भाजपने आपली सत्ता कायम केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात महाविकास आघाडी (काँग्रेस आणि शरद पवार गट) आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.राज ठाकरे आज गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर (शाखा ५६), मालाडमधील एच पी शॉपिंग सेंटर (शाखा ४६), दत्ता मंदिर रोड (शाखा ३६) आणि कुरार व्हिलेज (शाखा ३७) येथे मनसेच्या नवीन कार्यालयांचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर बोरीवली पश्चिमेकडील सत्यविजय सोसायटी (शाखा १८) आणि एक्सर मच्छी मार्केट (शाखा १०) येथे भेट देतील. दहिसर पश्चिमेकडील रामचंद्र पावसकर मार्गावरील शाखेचं (शाखा ७) उद्घाटन देखील ते करतील. त्यांचा आजचा दौरा जोगेश्वरी पूर्व येथील JVLR जवळच्या शाखा ७४ च्या उद्घाटनाने संपणार आहे. या दौऱ्यामुळे राज ठाकरे थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची संघटना मजबूत करत आहेत, ज्यामुळे मनसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com