शरद पवार कधीही शिवरायांचं नाव घेत नव्हते, राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीय राजकारणाला सुरुवात - राज ठाकरे

शरद पवार कधीही शिवरायांचं नाव घेत नव्हते, राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच जातीय राजकारणाला सुरुवात - राज ठाकरे

महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबाबत सुरू असलेल्या राजकीय वक्तव्यावरून राजकारण तापलेले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्रात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबाबत सुरू असलेल्या राजकीय वक्तव्यावरून राजकारण तापलेले आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून टीका केली होती. तेव्हा आजारी होता. आता बरं बाहेर पडलात, अशा शब्दात राज यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यावर मी बाहेर फिरत असल्याने काही लोकांच्या पोटात गोळा आल्याचा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आजपासून कोकण दोऱ्यावर आहेत.

पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, तेव्हा “नाही हो.. गोळे बिळे येत नाहीत असले काही.. काहीतरी काय? हे बाहेर पडले म्हणून माझ्या पोटात कशाला येतील गोळे?” असा खोचक सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला. यासोबतच ते म्हणाले की, त्यांनी समान नागरी कायद्यावरही भाष्य केलं. समान नागरी कायदा असा महाराष्ट्रात आणता येत नाही. तो देशात आणता येतो. एका राज्यासाठी कायदा नसतो. हा कायदा देशभरात लागू करण्याचं केंद्र ठरवतं. त्यानंतर संपूर्ण राज्यांना हा कायदा लागू होतो. तो आला पाहिजे. ही आमची पहिल्यापासून मागणी आहे.

सध्या जातीचं राजकारण सुरू असून या जातीय राजकारणाचा जन्म 1999 साली एनसीपी चा जन्मापासून सुरू झाली असल्याची घणाघाती टीका राज ठाकरे यांनी केली. राष्ट्रवादीच्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीय राजकारणाला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. मुस्लिम मते जाण्याची भीती वाटल्यानेच इतर टोळ्या उभ्या करण्यात आल्या. त्यातून फंडिग गोळा करण्यात आलं. असा जोरदार हल्लाबोल राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com