उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक म्हणाले, छान दिवस होते ते, माहीत नाही मला, कोणीतरी विष कालवलं की...

उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पाहून राज भावुक म्हणाले, छान दिवस होते ते, माहीत नाही मला, कोणीतरी विष कालवलं की...

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली आहे. तसेच हा कार्यक्रम घराघरात पोहचला होता. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहभागी होणार आहेत.

या एपिसोडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अवधूत गुप्ते राज ठाकरेंना अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे जुने फोटो राज ठाकरे यांना दाखवण्यात आले आणि प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरे भावुक झालेले पाहायला मिळत आहेत.

अवधूत गुप्ते यांनी हे फोटो दाखवून प्रश्न विचारला की, काय वाटतं हे सगळं एकत्र पाहून? यावर उत्तर देत राज ठाकरे म्हणाले की, खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला, कोणीतरी विष कालवलं की नजर लावली. त्यानंतर गुप्तेंनी पुढे म्हटले की, हे दिवस परत येऊ नाही शकणार? असा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com