Raj Thackeray MNS Melava : शिंदे, दादांसह भाजपलाही घेरलं; मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

Raj Thackeray MNS Melava : शिंदे, दादांसह भाजपलाही घेरलं; मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन संताप व्यक्त केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सन्नाट्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेतील विसंगतीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
Published on

मुंबईत आज मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. “निवडणुकीचा निकाला लागल्यावरती, ज्या दिवशी निकाल लागला महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा पसरला. हे पहिल्यांदा मी बिघतलं. जो जल्लोष व्हायला पाहिजे होता. तो झाला नाही. लोकांमध्ये संभ्रम होता. असा निर्णय कसा आला प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर मी पाहिलं की महाराष्ट्रात सन्नाटा पसरला आहे. ज्या प्रकारे जल्लोष व्हायला हवा होता तो दिसला नाही. लोकांनाच कळलं नाही की असा कसा निर्णय आला. माझ्या घरी एक व्यक्ती आली ती आरएसएस संघासोबत निगडित व्यक्ती होती. त्यांनाही पटलं नाही. तेव्हा ते म्हणाले इतना सन्नाटा क्यों है भाई कोई जीता होगा. पण महाराष्ट्रात जो सन्नाटा पसरला आहे कसलं दीपक आहे?

राजू पाटील यांच्या इथे एक गाव आहे तिथे 1400 लोकसंख्या आहे. त्या गावातून एकही मत राजू पाटील यांना पडलं नाही ज्या ठिकाणी चौदाशेच्या चौदाशे मत पडायचे तिथे आपला एक माणूस आहे, त्याला त्या भागातून साडेपाच हजारच्या मतदान होतं नगरसेवक झाला. त्याच वर्गामध्ये आता विधानसभेला निवडणुकीसाठी उभा होता तेव्हा अडीच हजार मतदान मिळाले.

निवडून आलेल्यांनाच विश्वास नाही त्यामुळे पडलेल्यांचा काय घेऊन बसलात. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले ही आठवी टर्म होती. बाळासाहेब थोरात 70, 80 हजार मतांनी निवडून यायचे त्यांचा दहा हजार मतांनी पराभव होतो. उद्या लोक म्हणतील राज ठाकरे यांचा पराभव झाला म्हणून ते असं म्हणतात, पण मी नाही बोलत अख्खा महाराष्ट्र बोलत आहे.

जर निवडून आले त्यांचे सुद्धा फोन मला आले त्यांना सुद्धा शॉक बसला. भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या ठीक आहे. पण अजित पवार 42? चार-पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार 42 जागांवर आले. कोणाचा तरी विश्वास असेल का?ज्यांच्या जीवावर सगळे मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात. शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले त्यांचे दहा आमदार येतात. आणि लोकसभेला अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला त्यांचे 42 आमदार येतात.

चार महिन्यांपूर्वी लोकसभा झाली. त्यात काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आले. एका खासदाराखाली सहा आमदार असतात. त्या काँग्रेसचे 15 आमदार येतात. चार महिन्यात लोकांच्या मनात फरक पडला.काय झालं कशामुळे झाला हा संशोधनाचा विषय आहे. लोकांनी आपल्याला मतदान केलं पण ते केलेला मतदान कुठेतरी गायब झालं ते फक्त आपल्यापर्यंत आलं नाही. अशा प्रकारच्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुकांना न लढवल्या तर बरं, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com