Raj Thackeray at Nagpur
Raj Thackeray at NagpurTeam Lokshahi

ढोल-ताशा, झेंडे अन् हजारोंची गर्दी; राज ठाकरे नागपुरात दाखल... वाचा कसा असेल विदर्भ दौरा?

आज सकाळी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रेल्वेद्वारे नागपूरला पोहोचले आहेत.
Published by :
Vikrant Shinde

राज्यात राजकीय भुकंप झाला , सत्तांतर झालं, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, राज ठाकरे व त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व राजकारणापासून दूर असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी या सर्व सत्तापालटावर व आता सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर देखील फारसं बोलणं आतापर्यंत टाळलं आहे. मात्र, आता राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज सकाळी राज ठाकरे विदर्भ दौऱ्यासाठी रेल्वेद्वारे नागपूरला पोहोचले आहेत.

Raj Thackeray at Nagpur
मनसेमध्ये इनकमींग होणार? राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य...

असा असेल विदर्भ दौरा:

  • 18 सप्टेंबर - नागपूरला 6 शहरी विधानसभा विभागाच्या बैठका

  • 18 सप्टेंबर - 6 ग्रामीण विधानसभा विभागाच्या बैठका

  • 19 सप्टेंबर - सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद

  • 19 सप्टेंबर - दुपारी चंद्रपूरला रवाना होणार

  • 20-21 सप्टेंबर - अमरावतीत विभागवार बैठक

  • 22 सप्टेंबर - मुंबईत परतणार

राज ठाकरे करणार महाराष्ट्रभर दौरे:

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुंबई, पुणे, ठाणे व औरंगाबाद येथे सभा घेतल्या होत्या. शेवटी झालेल्या औरंगाबाद (संभाजीनगर) येथील सभेमध्ये राज ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने ते तितकेसे सक्रीय दिसले नाहीत. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा दौऱ्याची वाच्यता केली. त्यामुळे विदर्भ दौऱ्यानंतर आता राज ठाकरे महाराष्ट्रभर दौरे करतील असं अपेक्षित आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com