Raj Thackeray : '...आणि मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली'; राज ठाकरेंनी सांगितलं मराठीचं बाळकडू कसं मिळालं
वरळी येथील डोम सभागृहात आयोजित 'आवाज मराठीचा...' विजयी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधीत केले.
मराठीचं बाळकडू घेतलंय.. होय आमच्यासाठी हे बाळकडूचं होतं
"लहानपणापासूनचं अनेक प्रसंग बाळासाहेबांसोबतचे आहेत. मात्र १९९९ सालचा प्रसंग कधीही विसरणार नाही. त्यावेळी शरद पवारांनी आपला पक्ष स्थापन केला. सत्तेसाठी शिवसेना आणि भाजप वादामध्ये काहीच निर्यण होईना. एकेदिवशी मातोश्रीला दोन गाड्या आल्या. प्रकाश जावडेकर, मीनलताई बाळासाहेबांना भेटायला आले. मुख्यमंत्रीपदाचा विषय सुरू होता. सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं हा त्यांचा निरोप घेऊन मी बाळासाहेबांकडे गेलो. ते म्हणाले त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेला हाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावर झाले, तो मराठीशी तडजोड करणार नाही. त्यामुळे या पुढेही तुम्ही सर्वांनी सावध आणि सतर्क राहणं गरजेच आहे. ही मराठीसाठीची एकजूट कायम राहावी. बाळासाहेबांच स्वप्न पुन्हा साकारावं," असे सांगून राज ठाकरे यांनी आपले भाषण संपवले.