राज ठाकरे यांची आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा

राज ठाकरे यांची आज मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पुण्यात सभा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होणार आहे.

महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा होत आहे. तसेच आज संध्याकाळी राज ठाकरे पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठक घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बैठकीला पुणे शहरातील मनसे नेते पदाधिकारी उपस्थितीत राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच्याआधी नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली होती. आता सारसबाग येथे मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com