Raj Thackeray
Raj ThackerayTeam Lokshahi

राज ठाकरेंची रत्नागिरीत सभा, कुणावर तोफ डागणार?

राज ठाकरेंची रत्नागिरीत सभा, रिफायनरीवर काय असणार त्यांची भूमिका?

राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा आहे. रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरेंच्या सभेसाठीची मनसैनिक जय्यत तयारी करीत आहेत. कोकणातील या सभेला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचे आहे.

तसेच राज ठाकरे आज बारसूवर भूमिका मांडणार का? तसेच राष्ट्रवादीच्या घडामोडींवर काय बोलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? हे पाहणं महत्वाचे आहे. “सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू. असे टीझरमध्ये राज ठाकरेंच्या आवाजात म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com