Raj Thackeray : राज ठाकरे यांचा एकनाथ शिंदेवर हल्ला, ईव्हीएम आणि नमो टुरिझम सेंटरवर टीका
मनसेच्या वतीनं आज ईव्हीएममधून मतांची चोरी कशी होऊ शकते याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी जोरदार भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, “लोक म्हणतात की माझ्या भाषणाला गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत. कारण मतं चोरली जातात. म्हणून मी म्हटलंय, मतदार यादी स्वच्छ करा. पण ते ऐकत नाहीत. मतदान कितीही पारदर्शक असो, मॅच फिक्स केली जात आहे.” तसेच, शिंदे यांच्यावर टीका करत त्यांनी नमो टुरिझम सेंटरच्या वादावर भाष्य केलं. "शिवाजी महाराजांच्या गडावर मोदींच्या नावाने टुरिझम सेंटर उभं करणार? मोदींनाही याची कल्पनाही नसेल. हे सत्तेशी संबंधित आहे, आणि सत्तेतूनच मतांची चोरी होते," असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी पुढे सांगितलं, "महाराष्ट्रात असलेला राग दिल्लीला कळला पाहिजे. आम्ही 1 तारखेला मोर्चा काढणार आहोत. त्यावेळी महाराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाचं चांगलं चित्र दाखवू." राज ठाकरे यांनी सत्तेवर असलेल्या लोकांच्या कारभारावर तीव्र शब्दात टीका केली आणि लोकशाहीच्या सुरक्षेसाठी संघर्षाची भूमिका घेतली.

