Gunaratna Sadavarte : "...तर त्याला जबाबदार तुम्हीच"; मनसे कार्यकर्त्याची ॲड. गुणरत्न सदावर्तेंना धमकी, Audio clip viral
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्याने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंना धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर ही धमकी दिल्याचे समजते.
सदावर्तेंना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याची धमकी या कार्यकर्त्यांनी दिली आहे. फोनवरून देण्यात आलेल्या या धमकीचं ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, लोकशाही मराठी या ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी करत नाही. संबंधित कार्यकर्त्याने सदावर्तेंना जाब विचारत म्हटले की, “राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्ही चुकीचं विधान कसं करू शकता?” सदावर्तेंनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यावर, कार्यकर्त्याने त्यांना थेट धमकी दिली . “उद्या तुमच्या घरावर हल्ला झाला, तर त्याला जबाबदार तुम्हीच असाल.” या प्रकारामुळे राजकीय व कायदेशीर वर्तुळात खळबळ उडाली असून, याप्रकरणी पुढील चौकशी अपेक्षित आहे.