Raj Thackeray & Ganeshotsav
Raj Thackeray & GaneshotsavTeam Lokshahi

'राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला...' राज ठाकरे यांचं ट्वीट

राज ठाकरे यांनी ट्वीट करून मानले प्रशासकीय कर्मचाऱ्यांचं आभार

नुकताच राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मागील दोन वर्षे कोरोनाचं सावट असल्याने गणेशेत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करता आला नव्हता मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाचं संकट कमी झाल्यानं गणेशोत्सव कोणत्याही निर्बंधांंशिवाय साजरा झाला. खरंतर, मुंबई, पुणे यांसारख्या सारख्या ठिकाणचा गणेशोत्सव म्हणजे भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. परंतु, हा सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी अनेक प्रशासकीय कर्मचारी काम करत असतात. राज ठाकरे यांनी ट्वीट करत याच प्रशासकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Raj Thackeray & Ganeshotsav
आज मनसेची महत्त्वपुर्ण बैठक; आगामी निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर 'राज'मंथनाला सुरूवात

राज ठाकरे यांचं ट्वीट:

राज्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. कोरोनानंतरचा हा पहिला मोठा सण.हा सण अतिशय उत्सहात पार पडला, आणि तो देखील कोणतंही गालबोट न लागता. ह्याला महाराष्ट्र पोलीस, विविध महापालिका, आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन दलाचे मनापासून आभार. उत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील अगदी कॉन्स्टेबल ते राज्याच्या पोलीस महासंचालकांपर्यंत आणि महापालिका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे सफाई कर्मचारी ते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाप्रती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय कृतज्ञ आहे.

आपला नम्र,

राज ठाकरे.

Lokshahi
www.lokshahi.com