Raj- Uddhav Thackeray : राज ठाकरे आज पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर

Raj- Uddhav Thackeray : राज ठाकरे आज पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर

आज (12 ऑक्टोबर) सहकुटुंब मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मातोश्रीवर पोहोचले आहेत. आज ठाकरे बंधू सहकुटुंब मोतश्री निवासस्थानी स्नेहभोजन करणार आहेत. मागील वेळेस मागील वेळेस उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवास्थानी राज ठाकरे यांना भेटण्यास गेले होते, मात्र ते एकटेच होते.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • ठाकरे बंधू आज पुन्हा भेटले

  • राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी

  • उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम

आज (12 ऑक्टोबर) सहकुटुंब मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मातोश्रीवर पोहोचले आहेत. आज ठाकरे बंधू सहकुटुंब मोतश्री निवासस्थानी स्नेहभोजन करणार आहेत. मागील वेळेस मागील वेळेस उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवास्थानी राज ठाकरे यांना भेटण्यास गेले होते, मात्र ते एकटेच होते. मात्र मातोश्रीवर आज राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दाखल (Raj Thackeray And Uddhav Thackeray Meets Matoshri) झाले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या नात्यात यामुळे आणखीन दृढता वाढत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी मनसे-ठाकरे सेना युतीच्या चर्चा सुरू आहेत. मागील अनेक वर्ष दुरावा असलेल्या बंधूंमध्ये जवळीक वाढून थेट युतीचा चर्चा सुरू आहेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये आगामी मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याबद्दल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच भाजप आणि सध्याच्या सत्ताधारी युतीविरोधात एकी साधण्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांचे विभाजन टळेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.

महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार

मातोश्रीवर राज ठाकरे यांच्या वाढलेल्या फेऱ्यांमुळे सध्या मनसे आणि ठाकरे गट हे एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सलग सात वेळा भेट झाली आहे. त्यामुळे ही भेट फक्त कौटुंबिक मर्यादेपुरती आहे का? की यातून महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाला नवी दिशा मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com