Raj Thackeray VS Eknath Shinde :  Special Report मुंबई महापालिकेसाठी युतीची चर्चा?

Raj Thackeray VS Eknath Shinde : Special Report मुंबई महापालिकेसाठी युतीची चर्चा?

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीची चर्चा रंगली.
Published by :
Team Lokshahi
Published on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जेवणाचा आमंत्रण दिलं होतं. ते आमंत्रण स्वीकारून एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या घरी जेवणासाठी पोहोचले. राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काहीसा दुरावा आलेला पाहायला मिळत होता. याच दरम्यान या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका देखील केल्या होत्या. पण कालच्या सव्वा तास चाललेल्या या डिनर डिप्लोमसी भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांनी मनसेची प्रतिक्रिया दिला आहेत. प्रतिक्रिया देत म्हणाले की, "मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला .त्यावेळेस म्हणाले, "ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीमागे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांचं कारण असल्याची चर्चा रंगलीय. शिवसेनेतील बऱ्याच माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला असला तरी अद्याप उद्धव ठाकरे हे मुंबई मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळे मनसे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र आले तर निवडणुकांमध्ये त्याचा चांगला फायदा दोन्ही पक्षाला होईल".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com