ताज्या बातम्या
MNS Padhadhikari Melava Thane : मनसे पदाधिकाऱ्यांचा आज ठाण्यात मेळावा; राज ठाकरे राहणार हजर
MNS Padhadhikari Melava Thane : राज ठाकरे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी मार्गदर्शन करणार.
Raj Thackeray : मनसेचा आज ठाण्यात पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उपस्थितीत राहणार आहे. ठाण्यातील सी. के. पी हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत.