Raj Thackeray On Mahayuti : अख्खी विधानसभा खोके भाईंनी भरलीय, राज ठाकरेंचा महायुतीला टोला
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. तसेच या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसेच राज्यभरात गाजलेला विषय म्हणजे बीड मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच आणि सुरेश धस यांचा निकवर्ती सतीश भोसले उर्फ खोक्या, या खोक्याचा उल्लेख करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंची महायुतीवर तिखट टिपणी
"एक खोक्या भाई काय घेऊन बसलात, आतमध्ये अख्खी विधानसभा खोके भाईंनी भरलीये" असं मोठं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. अख्खी विधानसभा खोके भाईंनी भरली आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे. "विधानसभेत मूळ विषय बाजूला राहतात आणि बाकी विषय काढून तुम्हाला गुंतवले जात आहे". असं म्हणत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिखट टिपणी केली आहे.
मुंबई अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांच नाव
तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्ष रचनेत बदल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई अध्यक्ष या नव्या पदाची निर्मिती केली आहे. एवढेच नाही तर मुंबई अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा ही राज ठाकरेंनी केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घोषणेमुळे आपल्यावर एक दबाव असला, तरी आव्हानांचा सामना करायला आपल्याला आवडते, अशी प्रतिक्रिया मनसेचे नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.