“सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व”; राज ठाकरेंचे पुण्यात झळकले बॅनर्स
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे ( raj thackeray ) यांनी गुढीपाडव्याच्या (gudhipadwa) दिवशी झालेल्या सभेमधून मशिदींवरील भोंग्यासंदर्भात अल्टिमेटम दिला . या भोंग्यासंदर्भातील मुद्द्यावरुन राजकारण चांगलच तापलं आहे. तसेच यावर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही ऐकायला मिळत आहेत.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर लगेच पुण्यात राज ठाकरेंनी पत्रकार परिषद (press conference ) घेतली. यावेळी त्यांनी घोषणा केली की, ”५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला (Ayodhya ) जाणार आहे आणि महाराष्ट्र दिनी (maharashtra din ) म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये (aurangabad ) सभा घेणार आहे,”
राज ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याबद्दल सध्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. पुण्यात तर राज ठाकरेंनीच काढलेल्या व्यंगचित्राचे (Cartoon )बॅनर (banner ) लावून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
व्यंगचित्रामध्ये? नेमकं काय आहे?
या प्रभू श्रीराम हे चलो अयोध्या असं म्हणणाऱ्या विश्व हिंदू परिषद व भाजपा यांना उद्देशून “अहो देश घातलात खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे ‘रामराज्य’ मागितले होते. ‘राममंदिर’ नव्हे…!” असं म्हणत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. शिवाय, शेवटी हे राम…! असंही लिहिलेलं दिसत आहे.
यावर काँग्रेस (congress ) नेते सचिन सावंत (sachin sawant ) यांनी हेच व्यंगचित्र त्यांच्या ट्विट अकाऊंटवर शेअर केले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचे समजते. सदर व्यंगचित्र काढणारे राज ठाकरे ते हेच का की मग दुसरे कोणी?, असा सचिन सावंत यांनी टोला लगावला आहे.
बॅनर नेमकं कोणी लावलं हे अजून समजलेलं नाही. हे बॅनर पुण्यातील (pune ) अलका टॅाल्कीज चौक, गुडलक चौक, कोथरुड येथील करिष्मा चौक येथे लावण्यात आले आहेत.

