Raj thackeray : निवडणुका पुढे ढकला, ECI कडे राज ठाकरेंची मोठी मागणी
थोडक्यात
निवडणुका पुढे ढकला, ECI कडे राज ठाकरेंची मोठी मागणी
मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ?
कालच्या बैठकीत राज ठाकरेंनी कोणते मुद्दे उपस्थित केले होते?
सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोपर्यंत जाहीर करण्यात आलेला निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकला अशी मोठी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे. मतदार यादीत घोळ असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा, आम्ही तयार नसल्याचे सांगा असही राज ठाकरे म्हणाले. मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी कशासाठी ? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. निवडणुका लढवतं राजकीय पक्ष, राजकीय पक्षांना शेवटची मतदार यादी दाखवत का नाही असे म्हणत आमचं तुमचं करू नका, आमच्यासाठी निवडणूक आयोग एकच असल्याचंही राज म्हणाले. सत्तेतील तीन पक्षांसाठी तुम्ही काम करत नाही असं थेट उत्तरही राज ठाकरेंनी दिले. 80-90 हजारांनी निवडून येणारे थोरात कसे पडले, असा सवाल त्यांनी केला आहे. स्थानिक स्वराज आणि मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आयोगाची भेट घेतली. त्यावेळी ठाकरे बंधू चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीनंतर आता सर्वपक्षीय नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. त्यात हे नेते काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
कोण काय म्हणालं?
ठाकरे बंधूंनी एकीकडे राज्य निवडणूक आयोगाकडे जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली तर, दुसरीकडे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्या त्रुटी सांगितल्या होत्या त्यावर काम झाले नाही – बाळासाहेब थोरात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत. त्याबाबतही अनेक तक्रारी असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. अंतेश्वर गंगाराम शिंदे हा उदगीर मतदार आहे. त्याचा कोणता ठावठिकाणा नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. EPIC क्र. वेगवेगळा असायला पाहिजे. बरेच मतदार असे की ज्यांना एकच EPIC क्र असल्याचे पाटील म्हणाले. आम्ही सगळे पुरावे दिले, ते तुम्हाला पटत आहेत ना? असेही जयंत पाटील यांनी विचारले. यादीत खुप घोळ तर मग ही निवडणूक पारदर्शक कशी ? असे वडेट्टीवार म्हणाले. बोगस मतदारांवर अंकुश का नाही फाल्तू उत्तर देऊ नका असे म्हणत शेकप नेते जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
आयोगाला भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, रईस शेख, अनिल परब, अनिल देसाई, अजित नवले उपस्थित होते. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्यात अशी मागणी करण्यात आली.
राज ठाकरेंनी कोणते मुद्दे उपस्थित केले?
1. अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत मग मतदार नोंदणी बंद का? ज्यांनी १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांनी मतदान करायचं नाही का?
2. अनेक जिल्ह्यात दोन दोन ठिकाणी मतदारांची नावे आहेत, त्याचं काय करायचं
3. मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे मग, निवडणुकीला कसे सामोरे जाता?
4. काही ठिकाणी वडिलांपेक्षा मुलाचं वय जास्त, असे घोळ कधी मिटवणार?
5. मतदार याद्या सक्षम नाहीत मग त्यात दुरुस्त्या करणार का, दुरुस्ती करणार असाल तर ती प्रक्रिया कशी असेल?
6. मतदार याद्यांचा तपशील संकेतस्थळावर कधीपर्यंत उपलब्ध कराल?
7. 31 जानेवारी पर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहे. आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का ?