Raj Thackeray: 'माझ्या डोक्यावर मी तलवारी घेऊन नाही फिरत' - राज ठाकरे
मुंबईत आज मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईडीची नोटीस मिळाल्यानंतर त्याचा संबंध नरेंद्र मोदी यांच्यासोबत लावण्यात आला यावर प्रश्न उपस्थित केला आहे. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कोहिनूर मिल आणि ईडीची कहाणी स्पष्ट केली आहे.
याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले की, ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे नेमकं प्रकरण... ज्यावेळेस मी ती नोटीस पाहिली तर त्यात कोहिनूर विषयी लिहलेलं होत, पण मला एक कळलं नाही माझा या सगळ्यासोबत काय संबंध? त्यावेळी ती माणसं मला भेटली आणि मला बोलले की, तुम्हाला पैसे आले आणि तुम्ही ते घेतले.. पण आम्ही त्याचा टॅक्स भरला होता, आणि तिथेच आम्ही त्यातून बाहेर पडलो.. मग मी माझ्या सीएला विचारलं की नेमकं प्रकरण काय आहे? तेव्हा तो मला म्हणाला की, तुम्ही पैसे दिले पण तुमच्या पार्टनरने ते बाहेरच्या बाहेर फिरवले ते कंपनीपर्यंत गेलेच नाही... मग आम्हाला परत टॅक्स भरावाला लागला, इथेच विषय संपला...
पुढे राज ठाकरे म्हणाले ती, एवढ्या कारणावरून राज ठाकरे ईडीला घबरले आणि मोदींची स्तुती करायला लागले अशा बातम्या कानावर पडायला लागल्या... पण मला काय देण घेण आहे त्या गोष्टींशी, मी माझ्या डोक्यावर तलवारी घेऊन नाही फिरत... माझं बाकीच्यांसारख नाही आहे, 6 दिवस आधी मोदी म्हणाले की, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांना आम्ही आत टाकू आम्हाला हे नव्हतं माहित की, ते मंत्रिमंडळात टाकण्याबाबत म्हणत होते... आतमध्ये टाकू याचा अर्थ हा होतो हे मला आज समजल असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर टीका केली आहे.