Raj Thackeray : बूथ लेव्हल एजंट नेमणुकीवरून राज ठाकरेंची नाराजी, पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलं

Raj Thackeray : बूथ लेव्हल एजंट नेमणुकीवरून राज ठाकरेंची नाराजी, पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलं

राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • बूथ लेवल एजंट नेमणुकीवरून राज ठाकरेंची नाराजी

  • सोमवारपर्यंत मतदार याद्याची अपडेट द्या, नाहीतर राजीनामा'

  • राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलं खरड पट्टी काढली

राज्यात आणि केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या विरोधात लढा देणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकीत एकत्र येऊन निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. यावरून आता निवडणूक जाहीर होताच राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली .

राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलं खरड पट्टी काढली. बूथ लेवल एजंट नेमणुकीवरून राज ठाकरेंची नाराजी व्यक्त केली असून सोमवारपर्यंत मतदार याद्याची अपडेट द्या, नाहीतर राजीनामा' राज ठाकरेंनी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना खडसावलं आहे.

तीन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत बैठक घेतली होती. त्यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली असून मनसेने महाविकास आघाडीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मुंबईत मतचोरीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीमधील पदाधिकाऱ्यांबरोबर एकत्रित बैठक घेतली होती.

निवडणूक आयोगाने नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानंतर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर तसेच शाखा अध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत. मनसेच्या शहर कार्यालयाजवळील एका सभागृहात ही बैठक होणार असून, यामध्ये राज ठाकरे नक्की काय मार्गदर्शन करणार याकडे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका काय राहील, याचा निर्णय होईल, असे मनसेच्या शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com