Raj Thackeray : राज ठाकरेंचं निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज, म्हणाले...
थोडक्यात
गोरेगाव नेस्को ग्राऊंडवर मनसेचा ग्रॅंड मेळावा
मेळाव्यात राज्यातील सर्व पदाधिकारी पोहोचले
राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले
मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा एक मेळावा पार पडला. या मेळाव्यावेळी राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ओपन चॅलेंज दिले आहे. मतदार यादी जोपर्यंत स्वच्छ होत नाही, तोपर्यंत तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा, असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच त्यांनी सर्वसामान्य मतदारांनाही सतर्क राहण्याची विनंती केली. महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की सतर्क राहा. म्हणून मी तुम्हाला यादी प्रमुखांना त्यासाठीच बोलवलं आहे. टप्प्याटप्प्यात सर्व काही होणार आहे. बरोबर होणार आहे. मी ज्या यादी प्रमुखांना बोलवलं आहे, त्यांना मी सांगतो की घराघरात जा. मी सर्वसामान्यांनाही सांगतो की आमचे लोक जेव्हा येतील किंवा इतर सहयोगी पक्षांचे लोक जेव्हा येतील, तेव्हा सहकार्य करा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.
एका घरात ८०० माणसं, ७०० माणसं अशी नावं दिली जात आहेत. जे मतदार नाहीत, अशी सगळी खोटी नाव भरुन हे सर्वजण निवडणुकीला सामोरे जायचं म्हणतं आहेत. हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतात ती मतदार यादी जोपर्यंत पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा, असेही चॅलेंज राज ठाकरेंनी दिले.