Raj Thackeray Melava : राज ठाकरेंच्या भाषणात 'लाव रे तो व्हिडिओ'; सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ व्हायरल
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या सकाळी दहा वाजता गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये मतदारयादी प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन केले आहे.
नुकतीच राज ठाकरेंची सभा पार पडली. यामध्ये राज ठाकरेंनी निवडणुक आयोगावर हल्लाबोल केला. भाषणात राज ठाकरे म्हणाले की, "2016-17 मतदारायाद्या विरोधात मी मुद्दा मांडला होता. मतदारयांद्यामध्ये गोंधळ सुरु आहे. बऱ्याच वर्षापासून मतदारयाद्यामध्ये घोळ सुरु आहे. भाजपाचे 232 आमदार निवडून आले तरी सन्नाटा होता. प्रत्येक शहर आणि गावात खोटे मतदार यादी भरलेत. 96 लाख जवळपास खोटे मतदार महाराष्ट्राच्य यादीत भरलेत. मतदान करा अथवा नका करू, मॅच फिक्स झालेली आहे. 'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात?' तुम्हाला राग येतो याचा अर्थ तुम्ही शेण खाऊन ठेवलाय राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारला आहे. भर सभेत राज ठाकरेंचा व्हिडिओ दाखवला त्यामध्ये सत्ताधारी आमदारांकडून बोगस मतदारांवर भाष्य या व्हिडिओमध्ये सतीश चव्हाण, संजय गायकवाड, मंदा म्हात्रेचे भाष्य दाखवले."