Uddhav-Raj Thackery : राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, सुबोध भावेंचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दोन्ही भाऊ एकत्र

Uddhav-Raj Thackery : राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, सुबोध भावेंचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दोन्ही भाऊ एकत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जवळपास नेक्ड भेटी झाल्या आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • उद्धव आणि राज ठाकरे अंधेरीतील कार्यक्रमात दिसले एकत्र

  • मराठी अभिनेते सुबोध भावे यांचा वाढदिवस

  • सुबोध भावेंचा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला दोन्ही भाऊ एकत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जवळपास नेक्ड भेटी झाल्या आहे. जुलै महिन्यात पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकाच व्यासपीठावर आले होते. हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले होते. हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा पार पडला.

मुंबईतल्या वरळी डोममध्ये राज-उद्धव एकत्र दिसले. यावेळी व्यासपीठावर कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता, मात्र ठाकरे बंधूच केवळ व्यासपीठावर असल्यानं राजकीय आडाखे सुद्धा बांधण्यास सुरुवात झाली. पुन्हा एकदा उद्धव आणि राज ठाकरे अंधेरीतील कार्यक्रमात एकत्र दिसले आहेत. मराठी अभिनेते सुबोध भावे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम सोहळ्याला दोन्ही भावांनी एकत्रित हजेरी लावली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com