Rajan Salvi : राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस
Admin

Rajan Salvi : राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस

राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस पाठवण्यात आली आहे.

राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांना 20 मार्च रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.आमदार राजन साळवी यांच्या एसीबी चौकशीमुळं निर्माण झालेल्या अडचणी आता अजून वाढताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांची चौकशी एसीबीकडून करण्यात आली होती. आता त्यांच्या कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस बजावण्यात आली आहे. मोठा भाऊ, पत्नी आणि वहिनीला एसीबीनं नोटीस बजावली आहे

ही दुर्दैवी बाब आहे.सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य शिवसैनिक आमदार झालेला आहे.उद्धव ठाकरेंसोबत जे आमदार आहेत. त्यांनाच नोटीसा पाठवल्या जात आहेत. तिकडे जाणारे वॉशिंगमशिनसारखं स्वच्छ होतात आणि आम्ही फक्त दोषी. मला नोटीस पाठवल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना नोटीस पाठवण्याची गरज काय? असे राजन साळवी यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com