Rajan Salvi Joins Shinde Shiv Sena : शिवबंधन काढलं, हाती शिवधनुष्य धरलं; राजन साळवींचा शिवसेनेत प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाण्यातील आनंदाश्रम जवळ एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राजन साळवी यांच शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली बघायला मिळाली. हाती धनुष्यबाण घेत तसेच गळ्यात शिवसेना शिंदे गटाचे उपरणं घेत राजन साळवी यांनी कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला आहे.
या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला रामराम करणार याबद्दलच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होत्या. या चर्चा सुरु असतानाच त्यांनी शिंदेच्या गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशातच आता त्यांचा पक्षप्रवेश झाला असल्याचे बघायला मिळत आहे.