"कोरोनाला हलक्यात घेण्याची सध्याची..."; - राजेश टोपे

"कोरोनाला हलक्यात घेण्याची सध्याची..."; - राजेश टोपे

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट झाले असून कोविड प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत. भारतातही सर्व राज्यांना कोरोना अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे.चीन, ब्राझीलमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग वाढला आहे. त्यामुळे देशात कोरोनासंदर्भात नव्या गाईडलाईन्स किंवा खबरदारीचे उपाय जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोकं वर काढला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी पहिली एका माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाला हलक्यात घेण्याची सध्याची परिस्थिती नाही. आपण पाहिलं की दुबईवरुन आलेल्या एका जोडप्यामुळे जगभराचा विचार केला तरी महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ही सर्वाधिक झाली होती. त्यामुळे इन्फेक्टीव्ही रेट प्रचंड आहे असं मी ऐकतोय. हा रेट जास्त असल्याने काळजी घेणं गरजेचं. केंद्र सराकराचा आरोग्य विभाग जागृक आहे त्याबद्दल माहिती घेत आहे. प्रत्येक राज्यांनी भारत सरकारचे सल्ले फॉलो करावेत काही अडचण येणार नाही,” असे ते म्हणाले

यासोबतच “मला वाटतं दुसऱ्यांबद्दल बोलणं पण योग्य वाटणार नाही. हा तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही यासाठी मला श्रेय देताय किंवा माझ्या कामाचं कौतुक करत आहात. या सरकारला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी माझ्या अनुभवाच्या आधारे मदत करायला तयार आहे. जनता आपली आहे. आपण जनतेसाठी काम करतो. माझा अनुभव आहे. तो सगळा अनुभव वापरुन कधीही, कशासाठीही बोलवलं तरी मी मिनिटभरामध्ये जाऊन जनतेच्या हितासाठी मदत करण्यास तयार आहे. असे त्यांनी सांगितले.

"कोरोनाला हलक्यात घेण्याची सध्याची..."; - राजेश टोपे
कोरोनाची चिंता नाही; जल्लोषात करा नववर्षाचं स्वागत - आरोग्यमंत्री तानाजी सावंत
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com