चकमकीत भारताचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी नाही  तवांग मुद्द्यावर राजनाथ सिंह यांचे  उत्तर

चकमकीत भारताचा एकही जवान शहीद किंवा गंभीर जखमी नाही तवांग मुद्द्यावर राजनाथ सिंह यांचे उत्तर

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळून लावले.

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारतीय हद्दीत घुसखोरी करू पाहणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी पिटाळून लावले. तवांगच्या यांगत्से येथे 9 डिसेंबरला उभय देशांच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. हे चिनी सैनिक भारतीय लष्कराची चौकी हटवण्यासाठी आले होते. पण भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर देत सडेतोड उत्तर देत चिनी सैनिकांचे मनसुबे उद्ध्वस्त केले. या चकमकीत दोन्ही देशांचे काही सैनिक जखमी झाले. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा सुनियोजित कट होता. भारतीय चौकीवर हल्ला करण्यासाठी चिनी सैनिकांची 15 दिवसांपासून तयारी सुरू होती. ठरलेल्या रणनीतीनुसार सोमवारी 17 हजार फूट उंचीवर यांगत्से भागातील भारतीय चौकी हटवण्यासाठी चीनचे 300 सैनिक पोहोचले होते.भारतीय सैनिक आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यावर चिनी सैनिकांनी माघार घेतली. पण यादरम्यान चिनी सैनिकांनी दगडफेक केल्याचे सांगितले जाते. या संघर्षात दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले. सहा भारतीय जवानांना गुवाहाटीत उपचारासाठी नेण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत उत्तर दिलं आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, “हा मुद्दा चीनकडेही गंभीरतेने उचलला गेला आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की, भारतीय सैन्य आपच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच इतर कोणत्याही परिस्थितीला आव्हान देण्याचा प्रयत्न पराभूत करण्यास तयार आहेत. राजनाथ सिंह पुढे म्हणाले, “या लढाईत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले. मात्र मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झाला नाही किंवा त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सच्या वेळीच हस्तक्षेपामुळे, चीनच्या सैन्याने माघार घेतली आहे." असे त्यांनी सांगितले आहे.

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे भारताची चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी 12 वाजता संसदेत लेखी निवेदन वाचून दाखवले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com