बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था झालीय सरकारची : राजू शेट्टी

बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था झालीय सरकारची : राजू शेट्टी

सरकारने शेतकऱ्यांविषयी असे माकड चाळे करू नये,राजू शेट्टींनी सरकारला सुनावले खडे बोल

विलास कोकरे|बारामती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे इंदापूर दौऱ्यावरती आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टींनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेट्टी म्हणाले की, सरकारची बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था झाली आहे.

जर सरकारला कांदा खरेदी करायचा होता तर नाफेडणे कांदा का विकला ? असा सवाल उपस्थित करत तो कांदा बाजारात आणल्याने कांद्याचे बाजार भाव पडले आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालं याला केवळ सरकार जबाबदार असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.

या नुकसानीला जबाबदार कोण ? यामुळे सरकारकडे शेतकऱ्यांविषयी काही धोरण आहे की नाही, असा सवाल राजू शेट्टी न्यू उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेले आहे. हे बरोबर नाही. त्यामुळे सरकारने असले माकड चाळे करू नयेत, असा टोला देखील शेट्टीने लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com