काळा पोशाख, डोक्यावर भगवा रुमाल; नवनीत राणांची सुसाट बुलेट राईड

काळा पोशाख, डोक्यावर भगवा रुमाल; नवनीत राणांची सुसाट बुलेट राईड

नवनीत राणा यांनी आज रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

नवनीत राणा यांनी आज रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. खासदार नवनीत राणा यांनी काळा ड्रेस परिधान करून भगवा रुमाल बांधून बुलेट सवारी केली.

सध्या मुंबई, दिल्ली, अयोध्या आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे ‘हिंदू शेरणी’ नावाचे बॅनर लागले आहेत. 6 एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त अमरावती येथे हजारो लोकांच्या उपस्थितत भव्य हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.

काळा पोशाख, डोक्याला भगवा गमछा बांधून नवनीत राणा सुसाट बुलेट राईडवर निघाल्या आहेत. बुलेट चालवत 'जय श्री राम'चा नारा देत नवनीत राणांनी बुलेट राईड केली आहे. नवनीत राणा यांनी आज रामनवमीच्या दिवशी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com