Ram Satpute : पराभव हा पचवता आला पाहिजे, तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे

Ram Satpute : पराभव हा पचवता आला पाहिजे, तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे

लोकसभा निवडणुकीनंतर राम सातपुते प्रथमच सोलापुरात आलं होते.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीनंतर राम सातपुते प्रथमच सोलापुरात आलं होते. ऋणानुबंध संवाद मेळाव्यातून भाजपच्या कार्यकर्त्यांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधला. यावेळी दौऱ्यादरम्यान राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

राम सातपुते म्हणाले की, पराभव हा पचवता आला पाहिजे, तसा विजयसुद्धा पचवता आला पाहिजे. त्यांना विजय पचवता येत नाही आहे. अहंकार आणि त्याच्यातून ज्या पद्धतीने वाचाळ बडबड सुरु आहे.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, मला असं वाटतं की, सोलापूरकरांना त्याठिकाणी विकास, इथल्या जनतेचं प्रश्न हे कधीही ते सोडवणार नाही. स्टंटबाजी करुन सोलापूरच्या जनतेची दिशाभूल करतील. सोलापूरकर पाहतील की कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण कसा उमेदवार निवडून दिला आहे. हे सोलापूरकर पाहतील. असं राम सातपुते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com