ताज्या बातम्या
Ram Shinde : विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड
महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे.
महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनामध्ये विधानपरिषद सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. मागील दोन वर्षांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे सभापती कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सध्या शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या उपसभापतीपदावर आहेत. आता नीलम गोऱ्हे यांना सभापतीपदासाठी संधी मिळावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जात होती.
याच पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी काल विधानपरिषद सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. आज विधान परिषदेच्या सभापतीपदाची घोषणा करण्यात आली. एकच अर्ज आल्याने सभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. विधानपरिषद सभापतीपदासाठी राम शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राम शिंदे यांची एकमताने विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड करण्यात आली.