यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्यू
Admin

यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी; 79 जणांचा मृत्यू

यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे.

यमनच्या राजधानीमध्ये जकात वाटप करताना चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. यात 79 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यमनची राजधानी सानातील बाबा अल यमन जिल्ह्यात एका पैसे वाटपाच्या कार्यक्रमातील ही घटना आहे.

ही घटना एका शाळेमध्ये घडली असून शाळेत रमजानच्या पार्श्वभूमीवर जकात वाटपच सुरू होते. जकात घेण्यासाठी अनेक लोकांची गर्दी जमली होती. अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com