ताज्या बातम्या
राज ठाकरेंच्या पत्राला काही अर्थ नाही - रामदास आठवले
अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भाजपनं निवडणूकीतून माघार घ्यावी , असं आवाहन केलंय.
भूपेश बारंगे, वर्धा
अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणूकीसंदर्भात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित भाजपनं निवडणूकीतून माघार घ्यावी, असं आवाहन केलंय. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे यांच्या पात्राला काही अर्थ नाही,राज ठाकरेंचं मत असलं तरी निवडणूक लढली पाहिजे, असं आठवले म्हणालेत. नागपूरहून चंद्रपूरला जात असताना हिंगणघाट येथील कार्यक्रमात ते थांबले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला..
शिवसेनेच्या ऋुतूजा लटके उमेदवार आहेत. त्या ठिकाणी रिपाइंन भाजपच्या मुरजी पटेल यांना पाठींबा दिला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत दलित समाज मोठ्या संख्येने राहणार आहे. त्यामुळे जो अंधेरी पूर्वचा जो गड आहे तो आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फरकाने आमचा उमेदवार निवडूण येईल, असंही रामदास आठवले म्हणाले.