रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे आमच्या सोबत आले तर...
Admin

रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे आमच्या सोबत आले तर...

मुख्यमंत्री व्हावे अशी अनेकांची इच्छा असून त्यात अजित पवार हे आहेत मात्र ती सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होत नाही.

प्रशांत जगताप, सातारा

मुख्यमंत्री व्हावे अशी अनेकांची इच्छा असून त्यात अजित पवार हे आहेत मात्र ती सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होत नाही. अजित पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी लवकर मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील असे सुतवाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी साताऱ्यात केले आहे..

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला कोणताही धोका होणार नसून महायुती भक्कम असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्याचे असून ते गावी आले होते. त्यांच्यावर कोणतीही टांगती तलवार नसून टांगती तलवार ही उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेले नसते. उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते त्यामुळे शिवसेनेत महाबंड झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला कोणताही धोका होणार नसून महायुती भक्कम आहे.

अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची लवकर संधी मिळेल असे वाटत नाही. राज ठाकरे यांनी स्वतंत्र रहावे. त्यांना भाषण करायला आवडते, ते आमच्या सोबत आले तर त्यांना एवढे भाषण करायला मिळणार नाही. त्यांची आम्हाला आता आवश्यकता नाही. त्यांना सोबत घेणे भाजपला देशपातळीवर परवडणार नाही असे सांगत रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com