Ramdas Athawale On Uddhav Thackeray | ठाकरेंची आठवलेंना ही ऑफर, आठवलेंची प्रतिक्रिया ऐकाच

Ramdas Athawale On Uddhav Thackeray | ठाकरेंची आठवलेंना ही ऑफर, आठवलेंची प्रतिक्रिया ऐकाच

लोकशाही मराठीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या त्या ऑफरबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
Published by :
shweta walge

लोकशाही मराठीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या त्या ऑफरबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. रामदास आठवले यांनी आमच्या सोबत यांवं आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री पद देऊ अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिली होती यावरच रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि माझे संबंध चांगले होते. सुरुवातीच्या काळामध्ये शिवशक्ती भिमशक्तीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी ही भूमिका मांडल्यानंतर आम्ही निर्णय घेतला. नंतर उद्धव ठाकरेंसोबत अनेक बैठका झाल्या. उद्धव ठाकरे अत्यंत चांगला स्वभाव असणारे व्यक्तिमहत्व आहे. पण 2014च्या लोकसभेला आम्ही एकत्र होतो नंतर विधानसभेमध्ये शिवसेना आणि भाजप वेगळी झाली. आणि उद्धवजींबरोबर माझी बैठक झाली. तेव्हा उद्धवजींनी मला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. तसच अनंत गिते यांचे अवजड उद्योग खातं देखील मला देण्याचं ठरलं होतं.

पण त्यावेळी मला अडचण होती की, मी भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर मेंम्बंर होतो आणि ज्यावेळेला अनिल देसाईला राज्यसभा दिलं होतं त्यावेळेला आमचं शिष्टमंडंळ उद्धवजींना भेटलं होतं. तेव्हा त्यांना ते म्हणाले की, सिरीयल हल्ल्यानंतर शरद पवार आठवलेंना राज्यसभा देतं होते पण त्यांनी काय स्वीकारली नाही. आता ते तुम्हच्यासोबत आलेले आहेत त्यामुळे आता त्यांना राज्यसभा तुम्हाला द्यायला हरकत नाही. शिवशक्ती भिमशक्तीची चर्चा संपूर्ण राज्यभर झाली. पण त्यावेळेला अनिल देसाई हा त्यांचा चांगला कार्यकर्ता आहे आणि त्यानी आधीपासून त्यांनी राज्यसभा त्यांना द्यायचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी मला काही दिली नाही. राज्यसभा जर मला दिली असती तर मी आलो असतो.

Ramdas Athawale On Uddhav Thackeray | ठाकरेंची आठवलेंना ही ऑफर, आठवलेंची प्रतिक्रिया ऐकाच
Sanjay Raut: संजय राऊतांची भाजपवर जोरदार टीका
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com