उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी फेल झालेले नेते- रामदास आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सोमवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. कृषी विज्ञान केंद्राकडे जाण्यापूर्वी रामदास आठवलेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी दोन्हीने एकत्र आले तरी महाराष्ट्राला काही फरक पडत नाही अशी टीका केली.
रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे राज ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी फेल झालेले नेते आहेत. दोन्हीने एकत्र आले तरी महाराष्ट्राला काही फरक पडत नाही. अस स्पष्टपणे ते म्हणाले आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप काल (23 फेब्रुवारी) शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरच नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात. याचे माझ्याकडे पुरावे आहेत असा सनसनाटी आरोप संजय राऊतांनी केला. यावर रामदास आठवले म्हणाले की, संजय राऊत फार बोलतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. संजय राऊत हे आरोप करण्यात एक्स्पर्ट आहे. उद्धव ठाकरे यांनाही त्याबाबत समजलं पाहिजे. नीलम गोऱ्हे आमच्याही पक्षात होत्या. शिवसेना वाढवण्यात नीलम गोऱ्हे यांचा मोठा वाटा आहे. संजय राऊत यांना ही भाषा शोभत नाही. मला वाटत नाही उद्धव ठाकरे यांना एवढ्या गाड्यांची गरज पडत असेल.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा का नाही हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी ठरवले पाहिजे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड होता त्याला पोलीसांनी पकडले आहे. त्याला मोक्का पण लावला आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्या थेट हात असल्याच या ठिकाणी दिसत नाही. नैतिक आधारावर मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी अनेक लोकांची मागणी आहे. त्याचा विचार करावा.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात मुंडे यांच्या थेट संबंध नाही. ही गोष्ट खरी आहे कि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध होते. वाल्मिकी कराड यांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याचे रिपोट आल्यानंतर लक्षात आले आहे. पण संतोष देशमुख यांच्या खुनाचा प्रकारणात धनंजय मुंडे यांच्या संबंध असल्याचे चित्र दिसत नाही.