भारतीय चलनी नोटांवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हवा - रामदास आठवले

भारतीय चलनी नोटांवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हवा - रामदास आठवले

चलनी नोटांवर डॉ बाबसाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असावे ही देशभरातील दलित बहुजन आंबेडकरी जनतेची मागणी आहे.
Published by :
shweta walge

जुई जाधव, मुंबई : महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भारतीय चलनी नोटांवर असायला हवी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

चलनी नोटांवर डॉ बाबसाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असावे ही देशभरातील दलित बहुजन आंबेडकरी जनतेची मागणी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची निर्मिती ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथावर आधारित आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे महान अर्थतज्ञ होते. त्यांच्या अर्थविषयक विचारांतून रिझर्व्ह बँकेची संकल्पना आणि रचना झाली आहे. महान भारतरत्न संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रउभारणीच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चलनी नोटांवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असावे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपती या देवतांचे फोटो छपावेत अशी केलेली मागणी ही राजकीय आणि गुजरात निवडणुकांवर डोळा ठेऊन त्यांची हिंदूविरोधी प्रतिमा पुसण्यासठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे असा टोला ना.रामदास आठवले यांनी लगावला आहे.

भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र आहे. आता भारतीय चलनी नोटांवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ही छायाचित्र यायलाच हवे अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली आहे. 

भारतीय चलनी नोटांवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हवा - रामदास आठवले
उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या रत्नागिरीतील वैद्यकीय मदत कक्षाचे काम कौतुकास्पद
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com