Ramdas Kadam : अनिल परब यांच्या आरोपावर रामदास कदम संतापले, म्हणाले की...
थोडक्यात
अनिल परबांनी केलेल्या आरोपानंतर रामदास कदमांनी केले धक्कादायक खुलासे
अनिल परबांना माहिती आहे का? माझी नार्को टेस्टची तयारी आहे
मी यावर कोर्टात पहिल्यांदा जाणार आहे. मानहानीचा दावा टाकणार
अनिल परब यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. फक्त हेच नाही तर मी माझ्या आरोपांवर ठाम असल्याचे त्यांनी म्हटले. रामदास कदम यांनी थेट म्हटले की, अनिल परब यांच्याविरोधात माझी पत्नी कोर्टात जाणार आहे. बदनामी करण्याचे काम परबांनी केले आहे. त्यावेळी काय झाले हे अनिल परबांना माहिती आहे का? माझी नार्को टेस्टची तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. त्यातून सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते सांगा.
पुढे रामदास कदम यांनी म्हटले की, माझी पत्नी दोन स्टोव्हवर जेवण बनवत होती. साडीला आग लागली. अन् आगीचा भडका उडाला. मी तिला वाचवलं. माझे हात भाजले. सहा महिने पत्नी अॅडमिट होती. जसलोकमध्ये. मी जसलोकमध्येच होतो. आजही आम्ही जीवाभावने संसार करतोय. तू काय सांगतो. अशा पद्धतीने तू बदनामी केलीय ना..त्यावर मी दावा टाकणार आहे. मी यावर कोर्टात पहिल्यांदा जाणार आहे. मानहानीचा दावा टाकणार आहे.
मुळात म्हणजे बाळासाहेबांचा विषय कोर्टात जावा हे पटत नव्हतं. पण मला आणि डॉक्टरांना खोटं ठरवत असाल तर मला कोर्टात जावं लागेल. मी सीबीआय चौकशीची मागणी करणार. तुला कावीळ झाली. तुला दिसणार नाही. असेही त्यांनी म्हटले. आता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाबद्दल कोर्टात जाण्याची आपली तयारी असल्याचे म्हणताना रामदास कदम हे दिसले.
अनिल परबांनी रामदास कदम यांच्यावर आरोप करत थेट म्हटले की, 1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळले होते, याचीही नार्काे टेस्ट केली जावी, आता अनिल परबांच्या आरोपांवर बोलताना रामदास कदम यांनी स्पष्ट म्हटले की, मी नार्काे टेस्ट करण्यासाठी तयार आहे. माझ्या कुटुंबायाची अशी बदनामी केली जात आहे ना… मी थेट आता कोर्टात जाणार आहे. माझी पत्नीच माझ्या अगोदर अनिल परबच्या विरोधात कोर्टात जाईल.