"एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील"; रामदास कदम यांचे मोठे विधान
लाडकी बहीण योजनेवरुन अनेक चर्चा सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेवरुन अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. यातच नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
याच पार्श्वभूमीवर आता रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिला आहे. रामदास कदम म्हणाले की, "बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना चालू कराव्या लागतात. अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिलं, तर तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी दहा योजना पण चालू करता येतील सगळी सोंग करता येतात पण पैशांचे सोंग करता येत नाही. याची उद्धव ठाकरेंना माहिती नाही. उद्धव ठाकरेंना बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे."