महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर रामदेव बाबांचा अखेर माफीनामा

महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर रामदेव बाबांचा अखेर माफीनामा

रामदेव बाबा यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे राज्यात पुन्हा वादाला तोंड फुटले होते.

मुंबई : राज्यात सध्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरु आहे. राज्यपाल यांचा वाद थांबत नाही तोवर रामदेव बाबा यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे राज्यात पुन्हा वादाला तोंड फुटले होते. रामदेव बाबांचा सर्वच स्तरावरुन निषेध करण्यात येत होता. तर, विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. रामदेव बाबा विरोधात राज्य महिला आयोगाने तक्रार मिळताच त्यांना नोटीस पाठवत दोन दिवसांच्या आत खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर अखेर रामदेव बाबा यांनी वादावर अखेर जाहीर माफी मागून पडदा टाकला आहे.

महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर रामदेव बाबांचा अखेर माफीनामा
खडसेंचे षडयंत्र घड्याळात कैद, लवकरच समजेल; गिरीश महाजनांचा इशारा

रामदेव बाबा म्हणाले की, महिलांना समाजात समान दर्जा मिळावा यासाठी मी नेहमीच जागतिक स्तरावर महिला सक्षमीकरणासाठी काम केले आहे. सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या विविध उपक्रमांना आणि योजनांना प्रोत्साहन दिले आहे. भारतातील महिलांचा दर्जा वाढवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी विविध संस्थांसोबत काम केले आहे.

माझा कोणत्याही महिलेचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. आयोजित केलेला संपूर्ण कार्यक्रम महिला सक्षमीकरणासंदर्भात होता आणि कार्यक्रमाची काही सेकंदांची क्लिपिंग ठळकपणे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. जे प्रसारित केले जात आहे त्यात मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे.

मी नेहमीच मातृशक्तीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. माझ्या एक तासाच्या व्याख्यानात आई हे मातृशक्तीच आहे आणि कपड्यांबद्दल एक शब्द आहे. माझ्या विधानाचा अर्थ साध्या कपडे असा होता. तरी, माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या बोलण्याने दुखावलेल्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो, असे रामदेव बाबांनी म्हंटले आहे.

महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर रामदेव बाबांचा अखेर माफीनामा
‘बळी’ची लाच दिली म्हणून खंजीर खुपश्या लोकांना...; शिवसेनेचा हल्लाबोल

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

ठाण्यातील कार्यक्रमात महिलांसाठी योग शिबिराचे आणि महासंमेलानाचे आयोजन केले होते. महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते व महासंमेलानासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र, सकाळी योगा शिबिर झाल्यानंतर लगेच महिलांसाठी महासंमेलन सुरू करण्यात आले. त्यामुळे महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा रामदेव यांनी वादग्रस्त विधान केले. साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबांनी म्हंटले आहे.

महिलांबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर रामदेव बाबांचा अखेर माफीनामा
जयंत पाटलांच्या सुपुत्राचा विवाह थाटात; पाहा सोहळ्याचे शाही फोटो
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com