नमाज पडा, आणि हिंदूच्या मुली पळवा; रामदेवबाबांचे वादग्रस्त वक्तव्य

नमाज पडा, आणि हिंदूच्या मुली पळवा; रामदेवबाबांचे वादग्रस्त वक्तव्य

योगगुरू बाबा रामदेव हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

योगगुरू बाबा रामदेव हे वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी वक्तव्य केलं होतं की, महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात… आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. त्यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र पडसाद उमटले होते.

नुकतेच त्यांनी अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी राजस्थानच्या बाडमेरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. रामदेव बाबा म्हणाले की, हिंदू धर्म आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने कसे जगायचे हे शिकवतो. सदाचारी वागणूक असावी. आपले वर्तनही असेच असावे असं सांगतो. लोकांनी हिंसा आणि खोटेपणापासून दूर राहावे, माणसाने भांडणे, भांडणे, पाप आणि गुन्हेगारी यापासून दूर राहावे, अशी शिकवण हिंदू धर्म देतो.

मुस्लिम दहशतवादी असला तरी तो नमाज नक्कीच अदा करतो. अशा लोकांना इस्लामचा अर्थ फक्त नमाजपर्यंतच समजतो. पाच वेळा नमाज पठण करा आणि तुम्हाला जे काही पाप करायचे आहे ते करा.तुम्ही हिंदूंच्या मुली उचला, किंवा जिहादच्या नावाखाली दहशतवादी व्हा, तुमच्या मनात येईल ते करू शकता मात्र असे हिंदू धर्मात नसते. असे मुस्लिम समाजाविषयी त्यांनी वक्तव्य केलं आहे.

तसेच ते म्हणाले की, लोकांच्या म्हणजेच मुस्लिमांनुसार स्वर्ग म्हणजे पायजामा घालणे नव्हे. तुमच्या मिशा कापून घ्या. लांब दाढी वाढवा. फक्त टोपी घाला. असं इस्लाम सांगतो किंवा कुराण म्हणतो हेच मी म्हणत नाही, तर हे लोक हे करत आहेत. त्यांना जन्नत मिळावी म्हणून ते करत आहेत. मात्र स्वर्ग नरकापेक्षा वाईट आहे. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com