Ranjeet Kasle : रणजीत कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी
निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला काल बीड पोलिसांनी पहाटे ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरातील हॉटेलमधून बीड पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतलं आहे. रणजित कासले दिल्लीवरून पुण्यात आल्यानंतर स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होता.
बीड प्रकरणात रणजीत कासले याने गंभीर आरोप केले आहेत. रणजीत कासले पोलिसांना शरण येणार असल्याचे त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सांगितले होते. यातच आता रणजीत कासलेला बीड पोलिसांनी बीडच्या न्यायालयामध्ये हजर केले होते.
रणजीत कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून बीड जिल्हा न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. रणजीत कासलेच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्याकडे आहे.
यातच रणजित कासले याने पुण्यात विमानतळावर आल्यावर माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा त्याने अनेक गोष्टींवर तेव्हा भाष्य केले. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरपासून ते विधानसभा निवडणुकीकरता मतदान केंद्रावरील त्याच्या कामाशिवयी त्याने सर्व खुलासा केला. माझ्याकडे पुरावे असून मी सर्व गोष्टी उघड करण्यासाठी आलो असल्याचे रणजित कासले म्हणाला.