ताज्या बातम्या
Ranjit Kasle : "इंकलाब जिंदाबाद..." रणजीत कासलेकडून किल्ला कोर्टाबाहेर जोरदार घोषणाबाजी
रणजित कासलेला मुंबई गुन्हेशाखेने दिल्लीमधून अटके केली असून त्याच्या न्यायालयीन कोठडी वाढ झाली आहे.
कासले याच्यावर सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य, तसेच काही राजकीय नेत्यांविरोधात केलेले गंभीर आरोप या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर अटकेनंतर बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर झाली आहे. कासलेला मुंबई गुन्हेशाखेने दिल्लीमधून अटक केली. यानंतर रणजीत कासलेने किल्ला कोर्टाबाहेर "इलिगल अटक आहे. भारतात लोकशाही राहिलेली नाही" असं म्हणत "इंकलाब जिंदाबाद"ची घोषणाबाजी केली.