Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

Raosaheb Danve : रावसाहेब दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

जालना लोकसभेचे मतदान आज पार पडत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जालना लोकसभेचे मतदान आज पार पडत आहे. रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे आपल्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज मी माझ्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. एक महिना फिरत असताना लोकांचा प्रतिसाद, चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी 4 लाख मतांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, कारण मागची निवडणूक मी साडेतीन लाख मतांनी जिंकलो होतो. महाराष्ट्रामध्ये आमच्या 45 जागा निवडून येणार आहे. देशभरामध्ये आम्ही 400पार आमच्या मित्रपक्षासह करणार आहे. त्यामुळे या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहेत. ही आमची खात्री आहे. असे रावसाहेब दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com